ANTUR FORT

 

गौताळा अभयारण्यात मुख्य चार किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे प्रत्येक किल्ला एकदा तरी जरूर पाहण्यासारखा आहे.
अंतुरचा किल्ला हा औरंगाबादवरून जरी 114 किलोमीटर अंतरावर असला तरी येथे जाणारा रस्ता अत्यंत खराब आहे त्यामुळे वेळ जास्त लागतो.किल्ल्यापर्यंत जायला तसा रस्ता बनवलेला आहे पण दरवर्षी पावसाने त्याची वाट लागलेली असते.त्यामुळे गाडी काही अंतरावर लाऊन आपल्याला काही अंतर पायी जावे लागते.
किल्ला हा अत्यंत खुबीने बांधलेला आहे. त्याचे मोक्याचे ठिकाण, प्रवेशद्वाराची अभिनव रचना, भूभागावरून शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी केलेले विशिष्ठ बांधकाम आणि अश्या अनेक गोष्टीनी हा किल्ला सरस मानला जातो, जे आपण गडाच्या भेटीदरम्यान अनुभवाल.
किल्ला दुर्गम भागात असल्याने येथे ग्रुपसोबत जाण्यात जास्त मजा येते. त्यातच पावसाळ्यात हा भाग हिरव्यारंगाने अजूनच मोहक दिसतो.
कुठेही कठीण चढणे अथवा बिकट वाट नसल्याने फक्त चालण्याची तयारी ठेवणारा प्रत्येकजण किल्ल्याच्या सफरीचा आनंद घेऊ शकतो.
पाठीवर पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा मावेल एव्हडी स्याक, रेनकोट किंवा छत्री, पायात बूट आणि फोटो काढायला फुल चार्ज क्यामेरा एवड्या साधनसामग्रीसह ट्रेक सुरु करता येतो.
आपल्या शहरातले अनेकलोक पुण्या मुंबई कडच्या किल्ल्यांना भेट देतात, काही तर हिमालयात ट्रेकिंग चे थ्रिल पण अनुभवतात पण आपल्या भागातल्या किल्ल्यांना आपण भेट द्यायला मात्र काही विसरतात.
चला तर मग एक दिवसाची हि हलकी फुलकी सहल अनुभावूयात. चलो किल्ले अंतुर !!!
दि. ४ ऑगस्ट २०१९, औरंगाबाद येथून सकाळी ७ वाजता ट्रेक सुरु होणार आहे.
इतर माहितीसाठी फोन करा -८९९९८६८४०१.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *